Log in


ISW Marathi Shala celebrated - Virtual GudhiPadva

14 Jun 2020 11:01 AM | Anonymous

 मराठी  शाळेचा  (virtual) गुढीपाडवा  कार्यक्रम  (एप्रिल १९, २०२०)

by Sarita Deshpande

   दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आपल्या ISW मराठी शाळेने गुढी-पाडव्याच्या कार्यक्रमाची तयारी महिनाभर आधी पासून चालू केली होती. सर्व मुले, त्यांना  सादर  करायच्या  कविता , गाणी , उतारा  वाचन  यांची  जय्यत  तयारी  करत  होती. पण फक्त थोडासा  फरक  हा होता , की दर वर्षी आम्ही आमच्या  शाळेच्या  ठिकाणी मोठ्या हॉल मध्ये  जमून, पॉट लक करून सर्वजण ( शाळेची मुले, पालक ,  शिक्षक आणि परिवार ) एकत्र जेवण करतो, तसे न करता, या करोना च्या वातावरणात हा सण आम्ही virtually साजरा केला.

   शाळेच्याच वेळेत सर्व  मुले आणि त्यांचे पालक नटून सजून कॉम्पुटर समोर बसून या समारंभात सहभागी झाले.

आमच्या सगळ्या मुलांनी ‘ गणपती तुझे नाव चांगले’ ही गणपतीची प्रार्थना  म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली.सगळ्या उपस्थित  असलेल्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, आपल्या जवळ खास यानिमित्ताने ठेवलेल्या छोट्याश्या गुढीला वंदन केले.


शारव ने गुढी- पाडव्याचे महत्व यावरील एक उतारा वाचून हा सण का व कसा साजरा केला जातो, त्याचे आपल्या मराठी वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे असलेले महत्व, त्या दिवशी घरोघरी कशी गुढी उभारली जाते, हा दिवस हिंदू वर्षातील पहिला दिवस आहे,  पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा दिवस आहे, अशी बरीच माहिती दिली.आरुष, स्वानंद , प्रांजली यांनी  मिळून अवयवांचे गाणे अत्यंत छान पद्धतीने सादर केले, सादर करताना त्यांच्या एकत्रित काम करण्याच्या पद्धतीचे सर्व पालकांकडून भरपूर कौतुक झाले. त्यानंतर आमच्या लहान वर्गातील अवनी , सान्वी, विवान , अनिशा , श्रेया या मुलांनी ‘ तूच माझी आई का?’  नावाचे एक छोटुकले नाटक सादर केले.सगळ्यांनीच खूप छान मेहनत घेऊन, सगळे अंक, बाराखडी , वार , तिथी याचे पाठांतर करून ते या नाटुकल्या अंतर्गत सादर केले.सगळ्या मावश्या, काका, यांनी या छोट्या शिलेदारांचे मनापासून कौतुक केले. 

 आपल्या bmm पाठ्यपुस्तकातील सगळ्याच मुलांचे लाडके असलेले ‘ घड्याळाचे गाणे ‘ साकेत ने अगदी खणखणीत आवाजात तोंडपाठ म्हणून सगळ्यांचीच शाबासकी घेतली तर  त्याचीच मोठी बहीण तृष्णा हिने ‘ एक छानशी ‘ बबलगम’  नावाची कविता अस्खलित आणि स्पष्ट पणे सादर केली. आर्यन ने ‘शुभंकरोती कल्याणम आणि भीमरूपी महारुद्रा ‘ हे दोन श्लोक - जे त्याचे बाबा त्याच्याकडून रोज म्हणवून घेतात, मनापासून म्हणले. शमिका ने या सध्याच्या करोना lockdown मध्ये घरी राहून ती काय वेगवेगळ्या गोष्टी करत ती हा घरात बसून राह्यचा वेळ कसा सत्कारणी लावते, तसेच या परिस्थिती बद्दल तिचे काही विचार हे सगळे लिहून त्याचे वाचन सादर केले. 

 तर ध्रुव आणि स्वरा या आमच्या विद्यार्थ्यांनी  त्यांना नेमून दिलेले ‘ कपिला आणि जेनी ‘  आणि ‘पाहुणे’  हे उतारे स्वच्छ, शुद्ध आणि स्पष्ट उच्चरात वाचून सादर केले. 

    एकूण  कार्यक्रम जरी ऑनलाईन साजरा होत होता तरीही प्रत्येक मुलाची उपस्थिती आणि सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाला आमच्या शाळेच्या इतर काही शिक्षिका आणि आमच्या डायरेक्टर मॅडम ही उपस्थित होत्या.  प्रत्यक्ष रित्या जरी भेटता आले नाही, तरीही या अशा आगळ्या वेगळ्या स्वरूपात गुढी पाडव्यानिमित्त भेटून मुले आणि पालक मंडळी एकदम खुश झाली यात मात्र शंका नाही.

   

    गुढी उभारली  सुख-समृद्धीची, जमुनी आगळ्या स्वरूपे 

    मराठीची गोडी वाढवू, उन्नत करू, बालचमू रूपे 


More Pictures and Videos link - https://photos.app.goo.gl/1yqtQY7cMnWxgESd8 

     

ISW Marathi Shala Gudhi Padva Event


This year, as every year, our ISW Marathi school had started preparations for the Gudi-Padva program a month in advance. All the children were preparing for the poems, songs and transcripts to be presented.  The only difference was that every year we gather in a big hall at our school premises, with potluck, (school children, parents, teachers and family) lunch together, without doing so, we virtually celebrated this festival in this Corona environment. 

   We celebrated this event during our regular school hours on Sunday. All the children and their parents sat in front of the computer and participated in the ceremony. 

  Our children started the program by praying Ganapati, 'Ganapati, Tuze Nav Changale’ 

   The reading on ‘Why and how this festival is celebrated, importance of Gudhi-Padva, how Gudi is erected at home on that day, this is the first day of Hindu Calendar, one of the auspicious days of the year, etc’ was presented by Sharav.

    Arush, Swanand, Pranjali performed  songs on ‘body parts’  together in a very nice way, while their method of working together was appreciated by all the parents. After that, Avni, Sanvi, Vivan, Anisha, Shreya from our Junior Class, performed a short play called 'Tuch Mazi Aai Ka?’ 

Everyone worked very hard, recited all the numbers, alphabets, verses, dates and performed it under this play. All the aunts and uncles appreciated this little wonder. 

    Saket recited a poem which is favorite of all the students. The poem was’ Ghadyalache Gaane’. Triashna performed a beautiful poem called 'Bubblegum' which applauded everyone as she recited it in a loud and clear voice

Aryan recited the two verses ‘Shubhankaroti Kalyanam and Bhimrupi Maharudra’ - which his father recites with him as an everyday ritual.

. Shamika shared her readings on how she makes the most of her time at home in the current Corona lockdown, as well as some of her thoughts on the situation.

        Our students Dhruv and Swara read the excerpts 'Kapila and Jenny' and 'Pahune' assigned to them in clear, pure voice and in an  efficient manner. 

The overall event was celebrated online, the attendance and participation of each child was commendable ,the event was also attended by some other teachers of our school and our director madam. Although we could not meet in person, there is no doubt that the children and parents were very happy to meet in such a unique way on the occasion of Gudi Padva.


Author
Comment
 

©2020 India Society of Worcester, Massachusetts - All Right Reserved. Contact Us      Privacy Policy

Powered by Wild Apricot Membership Software